महाराष्ट्राच्या राजकारणाला ग्रहण लागले आहे. एकीकडे शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीत गळचेपी होत आहे. तर शिंदे यांनी काल बोलतांना राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपचे नाव घेतले आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने सरकार आणि शिवसेनेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर आता शिवसेनेने देखील थेट लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेला मोठे भगदाड पाडत शिंदे गट स्थापन झाला. त्यानंतर शिवसेना कोमजली. शिवसैनिकांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व चिंतेत होते. बंडखोर आमदारांना वापस येण्याचे आवाहन करण्यात येत होते. शिवसेना नेते मिलींद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदेची नाराजी दुर करायला गेले होते. मात्र त्यांना अपयश आलं. यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्री पद आणि पक्ष प्रमुख पद देखील सोडतो पण समोर येऊन बोला, असे आवाहन एकनाथ शिंदे यांना केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय वर्षा निवासस्थान खाली केले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र आता शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या आनंदावर विरझन पडल्याची चर्चा आहे.
बंडखोर आमदारांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईत यावे लागेल. नंतर बहुमत सिद्ध होईल. शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावे लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी कठोर भूमिका शरद पवारांनी घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या मनगटात देखील ताकद आली. शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी विधान सभा बरखास्त बाबत ट्वीटरवर घेतलेली भूमिका देखील बदलली. त्यामुळे आता संजय राऊत थेट मैदानात येत एकनाथ शिंदेंना आव्हान देत आहेत.
महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करू. वेळ पडल्यास रस्तावर उतरून संघर्ष करू, असा इशारा संजय राऊतांनी दिला. या सर्व प्रकरणात फ्रंट फुटवर आलेली भाजप बॅकफूटवर गेली आहे. कारण आता सुत्रे शरद पवारांच्या हाती आहेत. पवारांच्या चतुरतेचा अनुभव भाजपला सकाळच्या शपथवीधी दरम्यान आला होता. त्यामुळे भाजपने वेट अॅण्ड वॉच ची भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडी मागे शरद पवार खंबीरपणे उभे असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपला थेट शरद पवार यांचा सामना करावा लागणार आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नारायण राणे यांची धमकी
“शरद पवार बंडखोर आमदारांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” अशी धमकी नारायण राणे यांनी शरद पवारांना दिली होती. त्यामुळे नारायण राणे यांची भूमिका ही भाजपची भूमिका असल्याची चर्चा रंगली आहे.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
बंडखोर आमदारांना भाजपचा पाठिंबा?
एकनाथ शिंदेंचा आमदारांसह गुजरात दौरा, नंतर आसाम दौरा हा भाजपचा प्लॅन असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता शिवसेना फोडण्यात केंद्राचा हात असल्याची चर्चा आहे. कारण शिवसेना आमदारांनी भाजप शासित राज्यात आसरा घेतला. महाराष्ट्राची सिमा पार करताच त्यांना गुजरात पोलिसांनी कडक सुरक्षा दिली होती. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले. त्या हॉटेलला देखील गुजरात पोलिसांचा पहारा होता. आसाममध्ये देखील तीच परिस्थीती आहे. त्यामुळे खेळाची चाल केंद्रातून भाजप रचत असल्याचे बोलल्या जात आहे.
शरद पवांरांनी देखील व्यक्त केली शंका
शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत निवडणूक आयोगानुसार देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे हे सहा पक्ष आहेत. काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिंदे यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे.”
“सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :