fbpx

शहर पोलीस दलाने सिटीझन पोर्टल अॅप सुरू

सोलापूर : सोलापूर पोलीस वेळेवर तक्रार घेत नाहीत, अशी नागरिकांची अोरड असते. ही अोरड अाता थांबेल. कारण  शहर पोलीस दलाने सिटीझन पोर्टल अॅप सुरू केले. यावर अापली तक्रार नोंदवू शकता. त्यावर पोलीस दखल न घेतल्यास १५ दिवसांत थेट पोलिस महासंचालक या अर्जाचा निपटारा का झाला नाही? याचा जाब संबंधित पोलीस अायुक्तांना विचारू शकतात.

संकेतस्थळावर जाऊन माहिती कशी घ्यायची. भरायची याची माहिती शहर पोलीस अायुक्तालयात सुरुवातीला देण्यात येईल. या पोर्टलद्वारे २३ सुविधा सुरू झाल्या अाहेत. नऊ सुविधांसाठी संबंधित व्यक्तीला लाॅगिन अायडी पासवर्डचा वापर करता लाभ घेता येेईल. अन्य सुविधांना लाॅगिन अायडी द्यावा लागेल, असे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

या वेळी सहायक अायुक्त शर्मिष्ठा घारगे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील अादी उपस्थित होते. काय माहिती नोंदता येईल पाहता येईल? आपण पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार अाॅनलाइन पाहू शकता ( संवेदनशील अथवा महिलांच्या संबंधातील गुन्हे ) अटक, अारोपींची माहिती पाहणे हरवलेल्या व्यक्तींची माहिती अनोळखी मृतदेहाची माहिती घेता येईल. ई- तक्रार देऊ शकता चारित्र्य पडताळणी अर्ज मिरवणूक परवाना अर्ज गणपती, नवरात्र अन्य उत्सवांचे परवाने घेऊ शकता वाहन चौकशी करणे अन्य १४ सुविधा अाहेत. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट महापोलिस डाॅट महाराष्ट्र डाॅट जीअोव्ही डाॅट इन (संकेतस्थळ)