fbpx

शासनाच्या प्लास्टिक बाटली बंदला महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफैक्च्रर असोसिएशनचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र शासनातर्फे प्लास्टिक बाटली बंद करण्याचा विचार चालू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नुकतेच नमूद केले आहे. या निर्णयाला महाराष्ट्र बॉटल वाटर मेन्यूफैक्चेर असोसिएशनचा विरोध असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी सांगितले आहे. शासनातर्फे सकारात्मक विचार नाही केला तर आंदोलन करण्याच इशारा देखील डुबल यांनी दिला आहे.

पर्यावरण संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र, आमच्या पोटावर पाय देणे बरोबर नाही. राज्यात ९०० आयएसआय युनिट धारक आहेत. त्यावर जवळपास २ लाख कामगारांचे जीवन अवलंबून आहे. कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून आम्ही हा व्यवसाय उभारतो. केंद्र सरकारच्या नियमानुसार पेट बॉटलचा वापर करतोत. राज्य सरकार चुकीचा आदेश का काढत आहे? असा प्रश्नही डुबल यांनी उपस्थित केला आहे.

प्लास्टिक जिरवण्याचे अनेक पर्याय आहेत. प्लास्टिकचे रिसायकल केल्यानंतर रस्ते, स्वेटर इत्यादी अनेक उपयोगासाठी त्याचा वापर होऊ शकतो बाटलीसाठी जे प्लास्टिक वापरतात त्याचे रिसायकल होऊ शकते प्लास्टिकच्या पिशवीसारख नाही. रिसायकल होण्यासाठी तंत्र्ज्ञान परदेशात आहे त्यामुळे प्लास्टिकच्या बॉटल वर बंदी आनता येणार नाही अशी माहिती डुबल यांनी दिली.

प्लास्टिकच्या बॉटल बंद झाल्यास काय परिणाम होतील
– हॉटेल मध्ये एक लिटर पाण्याऐवजी २० लीटर जर नॉन आरएसआयचा वापर वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते.
– आरओ. मेंटनस करणे शक्य होणार नाही.
– बेकायदा पाण्यामुळे पाणी माफिया तयार होतील.
– लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील.

1 Comment

Click here to post a comment