मराठी पाऊल पढते पुढे, विखे पाटलांची नात स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी

nila vikhe patil

स्टिफन लोफवन यांनी मागील महिन्यात स्वीडिश पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता लोफवन यांच्या सल्लगारपदी मूळ मराठी कुटुंबातील असणाऱ्या नीला विखे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. नीला या प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत कॉंग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.

निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला आहे. सुरुवातीला काही काळ त्या महाराष्ट्रात वास्तव्याला होत्या. विधानसभा विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे चुलते आहेत, नीला यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील सल्लगार म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्या ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य आहेत.