पॉर्न फिल्म बघण्यात महाराष्ट्र देशात अव्वल!

boy watching porn

वेब टीम: देशात इंटरनेटचे जाळे सध्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यात आता सर्वच कंपण्यांनी स्वस्तात इंटरनेट सुविधा देण्यावर जास्ती भर दिला जात आहे. परंतु याचा वापर इंटरनेट वर पॉर्न फ़िल्म पाहण्यासाठी जास्ती प्रमाणात केला जात असल्याच समोर आल आहे आणि यामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक पातळीवर रोज सरासरी 8.56 मिनिटे पॉर्न पाहिली जाते. भारतात 8.22 मिनिटे पॉर्न बघितली जाते तर महाराष्ट्र यात अघाडीवर आहे महाराष्ट्रात तब्बल 8.37 मिनिटे पॉर्न फिल्म बघितली जाते. इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्यामुळे पॉर्न फिल्म पाहण्यासाठी जास्ती वापर होत आहे. याचा गंभीर परिणाम वैवाहिक जीवनावर पडताना दिसत आहे. त्यातून महिलांना मारहाण होण्याचे प्रकार देखील घडताना दिसत आहे.