शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात मनविसेचा एल्गार 

MNS against wrong policies of the government
अपूर्व कुलकर्णी, पुणे :येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विद्यार्थी जागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. सेनेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव आणि विक्रांत अमराळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास मनविसेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या जयघोषात पथनाट्याला सुरुवात केली. हि नाट्यकृती पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती. या पथनाट्यातून “शासनाच्या चुकीच्या धोरणांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम” या विषयावर भाष्य करण्यात आले. तसेच मनविसेनेने केलेल्या अनेक विद्यार्थी आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला. ‘विद्यार्थी समस्या व विकास’ या धोरणातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यात असल्याचे सांगितले. म्हणूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सेनेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.पथनाट्याचा शेवट स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘जयोस्तुते’ या गीताने करण्यात आला.
या पथनाट्यातून मनविसेनेच्या मानसी कुलकर्णी, आदिती कामले, अस्मिता सोनवणे, निशा सोनवणे, काजल सलवदे, अक्षय मित्तल, दिगंबर देशमुख, गुरुप्रसाद बेळगावकर आदी कलावंतांनी सादरीकरण केले. त्यांना केशव धावडे यांच्या ढोलकी वादनाची सुरेख साथ लाभली.