काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

नांदेड जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यातील ९ नगरपालिका व दोन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. २ लाख ५हजार ५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९ नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी ५३ उमेदवार आहेत तर नगरपंचायतीकरीता दोन आणि नगरसेवक पदासाठी ७९३ उमेदवार आहेत.जिल्ह्यातील देगलूर, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव व मुदखेड या नऊ नगरपालिकांसह माहूर व अर्धापूर या नगरपंचायतीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहता, भाजपने वर्चस्व गाजवले. राज्यात लागलेले निवडणुकांचे निकाल, नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेसकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद या सर्व पाश्र्वभूमीवर निकालाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.आता तिसऱ्या टप्प्यांतील निवडणुकांमध्ये नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोख चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार राजा  कुणाला कौल देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

You might also like
Comments
Loading...