नाना पाटेकर ही भैया पुरस्कार स्पर्धेत सामील ; नानांना मनसे स्टाईलने प्रतिउत्तर

nana patekar vs mns

टीम महाराष्ट्र देशा -नाना पाटेकरांनी मनसेचं एक मत गेलं असं उत्तर दिल्यावर मनसेकडून पुन्हा एकदा याला प्रतिउत्तर मिळालं आहे. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून नानांना उत्तर दिलं आहे. हे उत्तर मनसे स्टाईलने असल्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा रंगली आहे

संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे की, नाना पाटेकर देखील भैया भूषण पुरस्कारात सहभागी झाले आहेत. या अगोदरच्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केलं आहे. तसेच त्यांना देखील भैय्या भूषण पुरस्कार नक्की मिळेल असं ट्विट केलं होतं.

काय आहे नेमका वाद ? 

फेरीवाल्यांचा मुद्द्यावरून राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊ नये अशी भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली होती तर याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांची मिमिक्री करत त्यांना चांगलच फटकारल होत. आता या वादाचा पुढचा पार्ट म्हणजे नाना पाटेकर यांनी मनसेला मत न देण्याच जाहीर बोलून दाखवलं आहे.