VIDEO: राजकीय आखाड्यातील राजकारणी भिडले मैदानावर; विधानभवन परिसरात आमदारांचा फुटबॉल सामना

mla football match

वेबटीम : राजकीय आखाड्यात एकमेकावर  कुरघोडी करण्याच राजकारण खेळणारे राजकारणी आपण पाहतोच. मात्र, आज विधिमंडळ परिसरात सत्तधारी आणि विरोधक यांच्यातील वेगळाच सामना पहायला मिळाला आहे. आज विधानभवन परिसरात आमदारांमध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला. एरवी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे आमदार बॉल गोलपोस्टमध्ये टाकण्यासाठी धडपडत होते. या सामन्यात देवेंद्र फडणवीस हे चक्क समालोचकाच्या भूमिकेत पहायला मिळाले.

मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या कामकाजातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी या विशेष फुटबॉलच्या विशेष सामन्याच आयोजन करण्यात आलं होतं. सभापती 11 विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता. दोन्ही टीममध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार खेळाडूंचा समावेश आहे. या सामन्यासाठी समालोचन मुख्यमंत्र्यांनी केलं. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे या सामन्याच रेफ्री म्हणून काम पाहिलं .

रामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघानं नाणेफेक जिंकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला.