हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार; जुन्यांना डच्चू तर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा: राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तार हा हिवाळी अधिवेशापुर्वी होणार आहे. तसेच सध्याच्या मंत्रिमंडळातील काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू देवून नव्यानं संधी संधी दिली जाणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. तसेच कॉंग्रेसला सोडचिट्ठी देवून आता एनडीएमध्ये येण्यास उत्सुक असणारे नारायण राणे यांना नव्या एनडीएमध्ये सहभागी करून घेण्याची चिन्हं जास्त असल्याचहि त्यांनी सांगितल आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात समस्या निर्माण झाल्याची कबुली देखील दिली आहे. तसेच 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असल्याचं त्यानी म्हंटलं आहे. तर सत्तेत असेलली शिवसेना सरकारच्या विरोधाची भूमिका घेते हे दुर्देवी आहे. मात्र याचा फायदा शिवसेनेला होणार नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Loading...