जलसंधारण मंत्री राम शिंदेंची उघड्यावरच लघुशंका ; स्वच्छ भारत अभियानाला फासला हरताळ

टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासला आहे. होय राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर लघुशंका करत देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या या सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवत आहेत.

राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव येथील कामाची त्यांनी पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.