पंकजा मुंडे यांना ताइक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट

मुंबई: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ताइक्वांदो या कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. मुंडे यांनी स्वत: ट्विट करत या बद्दलची माहिती दिली आहे. कोरियन सरकार, मुंबई कुकीवोन अकॅडमी यांच्यावतीने मुंबईमधील भारतरत्न राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ताइक्वांदो स्पर्धेच आयोजन करण्यात आल होत. यावेळी पंकजा मुंडे यांना कोरियन सरकारकडून ब्लॅक बेल्ट देवून गौरवण्यात आल आहे.