मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी उपाय

Mantralaya

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे मुख्यालय असणाऱ्या मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आत्म्हत्यांच्या घटनामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. आधी शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेलं विषप्राशन, नंतर अहमदनगर येथील बेरोजगार तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न आणि आता मेहुणीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व पॅरोलवर असलेल्या हर्षल रावते याने गुरुवारी मंत्रालयात केलेली आत्महत्या, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता सरकारकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत

Loading...

भविष्यात कोणी इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करू नये यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मधल्या चौकात जाळी बसविण्यात येणार आहे. एखाद्याने उडी मारलीच तरी ती व्यक्ती या नेटवर अलगद पडून त्याचा जीव वाचवा अशी यामागील कल्पना आहे. तर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

मंत्रालयात राज्यातील हजारो नागरिकांची अनेक कामे बारगळलेली असतात त्यामुळे अनेकवेळा नागरिक त्रस्त होतात. यातूनच आत्महत्या करण्याची वेळ सध्या येत आहे. दरम्यान आत्महत्या करण्याची धमक्या देणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, अशा व्यक्ती मंत्रालयात आल्यानंतर त्यांच्यावर खास लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...