fbpx

माढा , बारामतीसह 42 जागांवर भाजप-शिवसेना महायुती जिंकेल – महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : बारामती,  माढा आणि सांगलीसह किमान 42 जागांवर भाजप शिवसेना महायुती जिंकेल, असा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. महादेव जानकर यांनी सांगोला तालुक्यात दुष्काळाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती आणि माढा या जागा आम्ही जिंकू, असा दावा याआधी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. या मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तशी मोर्चेबांधणी करण्याचाही प्रयत्न केला आहे.

दरम्यान, जनावरांना पूर्वी 15 किलो चारा देण्यात येत होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर 18 किलो चारा देण्याची घोषणा मंत्री महादेव जानकर यांनी केली. तसे निर्देश प्रशासनाला दिले. जनावरांच्या संख्येबाबत आणि इतर जाचक अटी देखील शिथिल केल्या जाणार असल्याचे संकेत महादेव जानकर यांनी दिले.