विधानपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीला सुरवात झाली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे.या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं होतं.

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीकडून या ठिकाणी अशोक जगदाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सुरेश धस रींगणात आहेत. ही लढत सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यामध्ये आहे. मात्र या जागेसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या जागेचा निकाल काय येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.