fbpx

अमरावतीत काँग्रेसला धक्का; भाजपचे प्रवीण पोटे विजयी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला असून, लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे.

दरम्यान, अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का बसला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला.

तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना 620 तर शिवसेनेच्या राजीव साबळे यांना 306 मते मिळाली आहेत. परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत.