विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान ; मुंडे बंधू – भगिनीची प्रतिष्ठा पणाला

टीम महाराष्ट्र देशा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे.

यामध्ये लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली आहे.

विधानपरिषद निवडणूक लढती 

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)

नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

परभणी-हिंगोली – विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)

उस्मानाबाद-लातूर-बीड – सुरेश धस (भाजप) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष) – राष्ट्रवादीचा पाठिंबा

अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)

You might also like
Comments
Loading...