मराठा क्रांती मोर्चातून स्थापन झालेल्या ‘सेनेचा’ भाजप-शिवसेनेला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने शिवसेना-भाजपच्या युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पाठींबा देताना महाराष्ट्र क्रांती सेनेने उभे केलेले १५ उमेदवारांचे अर्जही मागे घेतले आहेत. याची घोषणा महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केली.

गेल्या वर्षीचं दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाची स्थापना केली होती. रायरेश्वर गडावर या पक्षाची घोषणा करण्यात आली होती. या निवडणुकीत या पक्षाकडून १५ उमेदवारही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ते सर्व उमेदवार मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र क्रांती सेनेच्या या पाठींब्यामुळे सेना-भाजपला फायदा होणार आहे.

Loading...

“आम्हाला आमच्या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सरकारला पाठिंबा दिला आहे. गरज पडल्यास समाजासोबत सरकारच्याविरोधात जाण्यासही तयार असेल”, असं सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि विनोद तावडे यांनी आमचा शब्द फिरणार नाही. जो शब्द दिलाय तो कायम राहील” अशी ग्वाही दिली आहे.