वास्तुतज्ञ् पं. आनंद पिंपळकर आणि व्ही एन एस ग्रुपच्या सचिन भोसले यांचा ” महाराष्ट्र की शान ” पुरस्काराने सन्मान

nitin gadkari and aanad piplgaokarn and sachin bhosle

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ञ् पं. आनंद पिंपळकर आणि परवडणाऱ्या किमतीतील घरांच्या प्रकल्पांचे मास्टर्स व्ही एन एस ग्रुपच्या सचिन भोसले यांना नुकताच इंडिया न्यूज या देशातील अग्रगण्य वाहिनीतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र की शान पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

पं आनंद पिंपळकर जगातील एक विश्वसनीय आणि सुप्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रज्ञ प्रसिद्ध नाव. गेल्या २५ वर्षांपासून ते क्षेत्रात कार्यरत आहेत.

आनंद पिंपळकर यांनी वास्तू , ज्योतिष शास्त्र या विषयावर 68 पुस्तके लिहिली आणि या पुस्तकांची वैशिष्ठे म्हणजे या सगळ्या विषयांशी असणारे वैज्ञानिक संबंध आणि कारणे यात नमूद करण्यात आली आहेत. त्यांच्या “आनंदी मृत्यू ” नावाच्या पुस्तकास मृत्युन्जय साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आलय. त्यांची आनंदी वास्तू हि दिनदर्शिका अवघ्या महाराष्ट्रात माहितीपूर्ण म्हणून सुप्रसिद्ध आहे.

महात्मा गांधी म्हणाले होते कि , राष्ट्राच्या विकासाचा मार्ग ग्रामीण भागातून जातो म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास झाला तर आपोआपच शहरांचाही विकास त्यातून साधला जातोय. म्हणूनच सरकार दरबारी ग्रामीण भागातील विकासाकडे जास्त लक्ष दिले जातंय त्यातून ग्रामीण भागाच्या विकासात आपल्या महाराष्ट्र अग्रेसर आहे. ह्या मिशन मध्ये फलटण येथील व्ही एन एस गृपचाही सहभाग आहे. परवडणाऱ्या किमतीतील ५ लाख घरे बांधण्याचा विडा त्यांनी उचललाय.

व्हीएनएस ग्रुपची स्थापना श्री सचिन भोसले आणि त्यांच्या टीमने सन 2010 मध्ये केली आहे. या अल्पशः कार्यकाळात पुणे, फलटण, महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरातील 18 निवासी प्रकल्प पूर्ण केले आहेत. 6 प्रकल्प बांधकाम चालू होते आणि महाराष्ट्रातील विविध भागातील 8 नवीन प्रकल्पांची घोषणा केली.

Loading...

नाईकबोमवाडी हे असे स्थान आहे की जिथे VNS ग्रुपने 1000 बंगल्यांची स्कीम बांधली आहे. हा प्रकल्प ना भूतो ना भविष्यती असा आहे कारण परवडणाऱ्या किमतीतील ह्या घराची किंमत आहे फक्त (1 आरके पूर्णपणे आरसीपीच्या बांधकामास फक्त 2,61,000 / – रुपये) आणि ते हि कोणतेही सरकारी किंवा राजकीय सहाय्य न घेता. मंदी, जीएसटी आणि डीमॉनिटायझेशन सारख्या समस्यांचा सामना करून देखील त्यांनी हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प देखील रेरा नोंदणीकृत आहे. हा प्रकल्प तयार असून लोकार्पण सोहळाही लवकरच होणार आहे. त्यांच्या याच कार्याबद्धल व्ही एन एस ग्रुपच्या सचिन भोसले आणि त्यांच्या टीमला महाराष्ट्र कि शान ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी त्यांच्या याच कार्याबद्धल पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि या यशाबद्दल त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

Loading...

2 Comments

Click here to post a comment