विधानपरिषदेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्तीपटू विजय नथू चौधरी यांनी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला.

विजय चौधरी यांची कामगिरी अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गगार यावेळी श्री. पाटील यांनी काढले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सदस्य शरद रणपिसे यांनीही विजय चौधरी यांचे अभिनंदन केले.