कोण होणार ‘महाराष्ट्र केसरी’ ? अभिजित कटके समोर असणार झुंजार बाला रफिकचं आव्हान

टीम महाराष्ट्र देशा- पुण्याच्या अभिजित कटके याने शनिवारी सोलापूरच्या रवींद्र शेडगे याला चीतपट करीत येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रातील मानाच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तसेच गादी विभागातून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

Loading...

कटके याने गादी गटातील सुवर्णपदक पटकावले आहे. आता अभिजित कटके याची महाराष्ट्र केसरी पदासाठी अंतिम लढत माती गटात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या बाला रफिकशी होणार आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असून महाराष्ट्र केसरी पदासाठी अंतिम लढत होणार आहे.

अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर आणि चाणाक्ष पैलवान मानला जातो. तो सलग तिसऱ्यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरलाय. बाला रफिकनं मैदानी कुस्तीचा हीरो म्हणून महाराष्ट्रासह उत्तरेतही आपला ठसा उमटवलाय. त्यानं माती विभागाची फायनल जिंकून, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीसाठी लढण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळं त्या दोघांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती कोण जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...