नवी दिल्ली – देशातली परिस्थिती लक्षात घेऊन देशात जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी केंद्र सरकार सर्व संबंधित घटकांसोबत, पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्री रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री, तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.
या संदर्भात केलेल्या एका ट्विट मध्ये त्यांनी सांगितले की, सध्या देशात एकूण क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी असलेल्या सर्व ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. केंद्र सरकार, सर्व राज्यांच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आवश्यकता समजून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
कालच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र आणि राज्याने या संकटकाळात परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केल्याचे गोयल यांनी सांगितले.
या मुद्यावर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या राजकारणबाबत खेद व्यक्त करत, महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी या ट्विट्समध्ये दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनामास्क फिरणे पडले महागात; ५ हजार जणांकडून ६ लाखांचा दंड वसूल
- धक्कादायक : अवघ्या १५ दिवसात कोरोनाने अख्खं कुटुंब केले उद्ध्वस्त
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- रेल्वेमध्ये मास्क न घालणे आता पडणार महागात,‘इतक्या’ रुपयांपर्यंत केला जाणार दंड वसूल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<