भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही

balasaheb thackeray and chagan bhujbal

मुंबई: शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांच्यावर लक्ष केले आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा. अशे सामातून स्पष्ट करण्यात आले. तसेच भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे देखील म्हटले आहे.

नेमके काय घडले होते तेव्हा ?

१९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.

जुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं

भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती.

म्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. अश्या शब्दात सामनातून भुजबळ, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शाब्दिक वर केले आहेत.