मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक अट ठेवत ‘मी राजीनाम देणार’ असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
“फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती,नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी, व्हिक्टिम कार्ड ह्यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले”, असे ट्विट संदीप देशपांडेंनी केले आहे.
फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती,नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी,victim कार्ड ह्यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोना ची भीती गेली आणि ते बाहेर पडले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2022
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दरम्यान या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी काल आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –