महामुलाखत: देशाचा विचार करण्याची किमंत महाराष्ट्राला चुकवावी लागली – शरद पवार

शरद पवार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेतली. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असल्याचा उल्लेख यशवंत चव्हाण यांनी केला याबाबद्दल तुम्हाला काय वाटत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारला असता. पवार यांनी प्रश्नाच अचूक उत्तर दिल.

शरद पवार म्हणाले, देशाचा विचार करण्याची किमंत महाराष्ट्राला चुकवावी लागली आहे. आज कोणालाही आधी अहमदाबादला नेले जाते. मात्र आपण देशाचे नेते असल्याची भावना लक्षात ठेवायला हवी.