सरकारचा खासगी शिक्षण संस्था चालकांना जबर दणका

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार असल्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.सरकारने 23 जून 2017 रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता दरवर्षी मे महिन्यात खासगी शाळांमधील शिक्षक भरती राज्य सरकारच करणार आहे.

दरम्यान, सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. आता शिक्षक भरतीसाठी पवित्र व्हिजिबल टू ऑल टिचर्स या पोर्टलचा उपयोग केला जाणार आहे. तर शिक्षण सेवकांना कोणती संस्था मिळेल त्याचंही नियंत्रण राज्य सरकारकडे असेल.

समायोजन झाल्यानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षणसेवकांची भरती होईल. राज्य सरकार अभियोग्य आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करणार आहे.