हेडगेवारांच्या स्मारकाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा दर्जा

नागपूर –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपुरातील स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आलीये.

हेडगेवार यांचं स्मारक स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतंच स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याची अधिसूचना जारी केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्मारकाला पर्यटनाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली.

रेशीमबागेतील स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागपूर भाजपचे उपाध्यक्ष भुषण दावडे यांनी गेल्या वर्षी केली होती. जिल्हा नियोजन आयोगाने या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्मृती मंदिराचा ‘नागपूर दर्शन’ यादीत समावेश केला आहे.

You might also like
Comments
Loading...