Maharashtra Governor- दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक

दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. काल राजभवनात कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी संलग्न कृषी महाविद्यालयांच्या दर्जावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जी महाविद्यालयं आवश्यक निकषांनुसार काम करत नसतील, त्यांची मान्यता काढण्याबाबत विचार करावा, असंही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केलं. कृषी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधली रिक्त पदं भरण्यासाठी विभागानं तातडीनं कारवाई करावी, असे निर्देशही राज्यपालांनी दिले.