पोलीस खाते होणार आणखी सक्षम

नागरिकांच्या मदतीसाठी आता आधुनीकरणाची कास.

वेबटीम-नागरिकांना अडचणीच्या काळात ताबडतोब मदत मिळावी याकरता महाराष्ट्र शासनाने पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनीकरण करण्याचे ठरविले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना प्रभावी सेवा पुरवण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनीकरण करण्यात येत आहे. जिल्हा- पातळीवरील पोलिस कंट्रोल रूममध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असल्याने सध्याची यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी सेवा देऊ शकत नाही. अनेक वेळा नागरिक पोलिस नियंत्रण कक्षात फोन करतात तांत्रिक कारणामुळे गरजुंना मदत करता येत नाही. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खऱ्या गरुजूपर्यंत तातडीने पोहचण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ( जी.पी.एस ) वापर करण्यात येणार आहे.

पोलिसांना ज्या ठिकाणी पोहचण्याची गरज आहे त्या ठिकाणा जवळील वाहन पाठविण्यात मदत होईल. नागरिक मोबाईल अॅप्स, एसएमएस, ईमेल आणि चॅट्सद्वारे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेशी संपर्क साधू शकणार आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे, पोलिस आरोपीला ओळखण्यात देखील सक्षम होतील. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना सर्व कॉलचे सविस्तर डेटा विश्लेषणही केले जाईल, नियंत्रण कक्षांमध्ये प्राप्त माहिती मुंबईतील नियंत्रण, नियोजन आणि विश्लेषण केंद्रासह सामायिक केली जाईल,

महाराष्ट्र शासनाने राज्यातील पोलिस कंट्रोल रूमच्या आधुनिकीकरणासाठी आणि मध्य मुंबईतील वरळी येथील नियंत्रण, नियोजन आणि डेटा विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी 42.9 कोटी रुपयांचा एक प्रकल्प मंजूर केला आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 4 सप्टेंबरला यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला.आहे. वरळीतील प्रकल्पाचा खर्च 44.54 कोटी रुपये इतका असेल कोणत्याही प्रकारची आणीबाणीच्या परिस्थितीत वरळी केंद्रात ताबडतोब मदत केली जाईल.

You might also like
Comments
Loading...