तब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड

तब्बल दीड वर्षांनंतर रंगणार शाहीरी आणि तमाशाचा फड

maharashtra cultural arts

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचं काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ओढवली होती. त्यामुळे या कलावंतांनी शासनाकडून मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या अनुषंगाने आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता लोककला सादर करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याअनुषंगाने बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून सुरू असलेली लोककलाकारांची उपासमार आता संपणार आहे.

लोककलामध्ये तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमासह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तमाशा कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या: