अखेर पिंपरी चिंचवडला मिळणार स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

पुणे: गेली अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी केली जात आहे. अखेर राज्य सरकारकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

औद्योगिक भरभराटीमुळे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या आज तब्बल २२ लाखांच्यावर पोहचली आहे. वाढत्या औद्योगिक करणाबरोबर शहरातील गुन्हेगारीचा टक्का देखील वाढला आहे. त्यामुळे मागील १५ वर्षापासून शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी केली जात होती, अखेर आज पोलीस आयुक्तालया स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नवीन पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत ग्रामीण भागातील ५ तर पुणे शहरातील ९ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहेत.