#महाविकासाघाडी : तिन्ही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता

blank

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या, महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वेगवान हालचाली सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी दिल्लीत चर्चा, बैठका आणि खलबतं सुरू होती; आता बैठकांचं केंद्र पुन्हा मुंबईत सरकल्याचं चित्र आहे.

दरम्यान काल नवी दिल्लीत, कॉंग्रेसच्या कार्यकारिणी समितीने आघाडी सोबत सत्तास्थापनेसाठी मंजुरी दिली. त्यानंतर, शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कोंग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याबाबत एकमत झाल्याचं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितलं. मात्र शिवसेनेशी याबाबत मुंबईत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची काल मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आज शिवसेना आमदारांची बैठक होणार असून,नेता निवडीसाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकही मुंबईत होणार आहे.

भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीनं घेतला असून दोन-तीन दिवसात तिन्ही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं आता शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात हालचालींना वेग येणार आहे.

महात्वाच्या बातम्या