३५ हजार नाही केवळ ५ हजार कोटींची कर्जमाफी

सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

नांदेड : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये झालेल्या सभेत राहुल यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर चांगलाच निशाना साधला आहे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना 35 हजार कोटींची केली, मात्र प्रत्यक्षात फक्त 5 हजार कोटीच दिले असून कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांची जात का विचारली जाते असा सवालही राहुल यांनी केला.

पुढे बोलताना राहुल म्हणाले की, जशी या देशाला उद्योगपतीची गरज आहे तसेच शेतकऱ्यांची आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून महाराष्ट्रात 9 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गुजरातमध्ये मोदींनी नॅनो फॅक्ट्रीसाठी एका व्यक्तीला 65 हजार करोड रुपये दिले. पण शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही.

You might also like
Comments
Loading...