मुंबई : राज्यात सध्या बंडाचे राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विवेक फणसळकर हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे उद्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने फणसळकर यांना मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अस्थिर राजकिय स्थितीत कायदा-सूव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अवस्थेत वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. फणसळकर हे मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी इच्छुक आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर लगेच आज राज्य सरकारने विवेक फणसळकर यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त केल्याची माहिती समोर आली.
Maharashtra Government appoints senior IPS officer Vivek Phansalkar as the Mumbai Police Commissioner. Outgoing CP Sanjay Pandey is scheduled to retire tomorrow.
— ANI (@ANI) June 29, 2022
यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्त म्हणून फणसळकर यांनी काम केले आहे. विवेक फणसळकर १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्याचबरोबर त्यांना मुंबई पोलिस दलात काम करण्याचा दांडगा अनुभवही आहे. विवेक फणसळकर यांची ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. फणसळकर यांच्या कोरोना काळातील कार्याचे राज्यभर कौतुकही झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<