सोशल मिडीयाचा सरकारकडून धसका: पॉझिटिव्ह वातावरण निर्मितीसाठी जाहिरात कंपन्यांची नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा: राज्य आणि केंद्र सरकार विरोधात सोशल मिडीयावरून क्षणाक्षणाला टीकेचा आगडोंब उठत आहे. सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णया विरोधात नेटकऱ्यांकडून ट्रोलींग केल जात आहे. आता याच सर्व गोष्टींचा धसका घेतलेल्या राज्य सरकारकडून आपली धोरणं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक खासगी जाहिरात कंपन्यांची नियुक्ती केली करण्यात आली आहे.

सरकारची भूमिका प्रसार माध्यमे आणि तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी 23 जाहिरात कंपन्याकडे देण्यात आली आहे. यातील काही कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची प्रचार मोहीम हताळली होती. या जाहिरात कंपन्याकडून सरकारच्या योजना संदर्भात ब्लॉग आणि लेख पोस्ट करणं, डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन धोरणा संबंधी हॅशटॅग ट्रेंड करण्यासह जनतेच्या मनात सरकार विषयी सकारात्मक भावना निर्माण करण्याचं काम एकल जाणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...