सट्टेबाजारातही भाजप – सेना महायुती तेजीत तर महाआघाडी पिछाडीवर

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात आज एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावटअसल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

तत्पूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेना बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. तर सट्टाबाजाराने ही महायुतीलाचं ग्रीन सिग्नल दाखवला आहे. सट्टेबाजांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात नवे सरकार हे युतीच असले तरी देखील महाराष्ट्रात महायुतीला 220 च्या पुढे जागा मिळणार नसल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने दोन्ही राज्यातील निवडणुकांवर 30 हजार कोटींचा सट्टा लागला आहे. भाजपा – 120 जागांसाठी -1.60 पैसे भाव, शिवसेना – 85 जागांसाठी – 3.00 रूपये भाव, काँग्रेस – 30 जागांसाठी – 2.50 पैसे भाव, राष्ट्रवादी काँग्रेस -30 जागांसाठी -3.50 पैसे भाव , असा सट्टा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या