परमबीर सिंग यांच्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही टाकला लेटर बॉम्ब

sanjay pande

मुंबई – पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालय आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली.

दरम्यान,ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

तत्पूर्वी, राज्य सरकारनं परमबीर सिंह यांच्याविरोधात सुरु केलेल्या दोन प्रकरणांतील प्राथमिक चौकशीला परमबीर सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच याविरोधात त्यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

परमबीर सिंह यांनी यावेळी संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह म्हणाले की, जर मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली, तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव टाकण्यात आला. यासंदर्भात परमबीर सिंह यांनी सीबीआयला देखील पत्र लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या