लॉकडाऊन : वाचकांची ‘महाराष्ट्र देशा’ला पसंती, 2 कोटी वाचक आणि 1 मिलियन फेसबुक लाईक

पुणे : लॉकडाऊनच्या काळात आपल्या ‘महाराष्ट्र देशा’ने २ कोटी वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे.तुम्ही माय – बाप वाचकांनी आम्हाला दिलेला उदंड प्रतिसाद आणि आमच्यावर टाकलेला विश्वास यामुळेच हे शक्य झालं आहे असं आम्ही मानतो…! प्रत्येक विषयातल्या निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखती ही आपल्या ‘ महाराष्ट्र देशा ‘ची वेगळी ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.

look down 2

बाळशास्त्री जांभेकर यांच्या ‘दर्पण’पासून सुरु झालेली मराठी वृत्तपत्रांची परंपरा आज शकडो वृत्तपत्रांच्या स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत देश – विदेशातील ताज्या घडामोडी पोहचवण्याचे काम करते आहे. पुढे काळ बदलला तसे प्रसारमाध्यमांचे स्वरूपही बदलले. आजची घटना उद्या वाचायला मिळण्याचे साधन असलेल्या वृत्तपत्रांना इलेक्ट्रॉनिक मिडीयाने एक मोठा पर्याय उभा केला. कारण इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून जे घडतय ते थेट व्हिडीओच्या स्वरूपातून नागरीकांपर्यंत पोहचू लागलं. काळ बदलला तसा मिडीयाच स्वरूप देखील बदलत जात आहे. आज २१ व्या शतकामध्ये वृत्तपत्रांना आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला एक नवीन पर्याय उभा राहत आहे तो म्हणजे ‘ डिजिटल मिडीया’ चा. याच आधुनिक युगातील थोड्याच काळात वाढत असलेले माध्यम म्हणजे ‘महाराष्ट्र देशा’. महाराष्ट्र देशा न्यूज हे आता ‘ 4 Pillar Publication Pvt. Ltd.’ कंपनीचा भाग आहे.

फेसबुक वर १० लाख लाईकचा टप्पा पार

इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम करत असलेल्या मनोज जाधव, विरेश आंधळकर, दीपक पाठक आणि अभिजीत दराडे या चार युवकांनी एकत्र येत प्रस्थापित मिडियाला एक नवीन पर्याय देण्यासाठी, सर्वसामन्यांचा, जागोजागी पिचल्या जाणाऱ्या गाव – खेडी ते शहरातील नागरिकांचा आवाज म्हणून उभे राहण्यासाठी सुरुवात केली आणि तीच ‘महाराष्ट्र देशा’ची खरी सुरवात झाली.संपूर्ण महाराष्ट्र हा एकसंध असावा, जातीजातीमध्ये असणारा बंधुभाव जपला जावा, महाराष्ट्राची अलौकिक परंपरा, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणि स्वराज्याचे स्वप्न, फुले- शाहू- आंबेडकरांचे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे व्रत आम्ही पुढे नेण्याची उर्मी बाळगतो म्हणूनच आमच्या कार्यांच नाव ‘महाराष्ट्र देशा’ हे निश्चित केले.

१६ जून २०१७ रोजी एका छोटेखाणी कार्यक्रमात ‘विशेष मुलांच्या’ हस्ते महाराष्ट्र देशा न्यूज वेबसाईटचे लाँचींग करण्यात आले. सुरुवात ते आजची परिस्थिती यामध्ये काळानुरूप बदल अंगीकारत आम्ही वाटचाल सुरु ठेवली आहे. अचूक विश्लेषण आणि निर्भीड बातम्यां, लेख यांच्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही आमची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात वाचकांनी आमच्या वेबसाईटला चांगलीच पसंती दिली आहे. अचूक आणि सत्य बातम्यांचे सातत्य राखल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात तब्बल २ कोटी वाचकांनी वेबसाईटला व्हिजिट दिली आहे.

दरम्यान, यात अजून एक मैलाचा दगड म्हणजे आजच आपल्या लाडक्या ‘महाराष्ट्र देशा’ने फेसबुकवर १० लाख लाईक्सचा टप्पा पार केला आहे. हे प्रेम आणि आपली आपुलकी अशीच वृद्धिंगत होत जावो हीच अपेक्षा.