मुलं पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजातून मालेगावमध्ये चौघांना बेदम मारहाण

crime

मालेगाव : मुलं पळवणारी टोळी गावात आल्याच्या अफवेतून अनोळखी माणसांना मारहाण करण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे काल याच अफवेमुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान ही घटना ताजी असतांना मालेगावमध्ये देखील बाहेर गावावरून आलेल्या टोळीला जमावाने मारहाण केल्याची घटना घडलीये.

पण समजदार नागरिकांच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली. मालेगावातल्य़ा अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुले पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौघांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली. अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यांच्या तावडीत असलेल्या चौघांना ताब्यात घेतले.चौघेही परभणी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलीये.

धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या

धुळे : सामूहिक हत्याकांडामधील  ‘त्या’ ५  मृतांची ओळख पटली