राज्यात कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – राजेश टोपे

rajesh-tope

मुंबई  : राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

कोरोनाचे संकट सर्वांसाठी स्वावलंबी आणि सशक्त बनण्याची संधी – छगन भुजबळ

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु – बच्चू कडू