मुंबईची जनता महापालिकेचा कर, मृत्यूची दारं उघडण्यासाठी भरतो का? – काँग्रेस

टीम महाराष्ट्र देशा :  गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला, यावरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. मुंबईकर महापालिकेचा कर, मृत्यूची दारं उघडण्यासाठी भरतो का?, असा सवाल महाराष्ट्र कॉंग्रेसने केला.

Loading...

मुसळधार पावसामुळे मुंबई जागोजागी तुंबली आहे, याचदरम्यान गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा मुलगा काल नाल्यात पडून वाहून गेला, अद्यापही त्याचा शोध लागला नाही. दरम्यान या मुद्यावरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला.

महापालिकेच्या गलथान कारभाराने पावला पावलावर अक्षरशः मृत्यूचा सापळा रचला आहे. या सापळ्यात एक चिमुकला हकनाक सापडला, असे कॉंग्रेसने म्हंटले, इतकेच नव्हे तर दरवर्षी उघड्या गटारात पडून वाहून जाण्याच्या घटना मुंबईत घडतात मात्र तरी पालिका याची दखल घेत नाही, असा आरोपही कॉंग्रेसने केला.

याचबरोबर मुंबईकर महापालिकेचा कर, मृत्यूची दारं उघडण्यासाठी भरतो का? असा सवालही कॉंग्रेसने केला. विशेष म्हणजे गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. या घटनेनंतर मुंबईकरांनी बीएमसीला दोषी ठरवले आहे. मात्र यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांनाचं दोषी ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या बेजबाबदार पणामुळे मुंबईमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याच त्यांनी म्हंटल आहे.Loading…


Loading…

Loading...