fbpx

राज्याच्या दूर्दशेस फडणवीस सरकारचं जबाबदार – कॉंग्रेसचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : कृषी, उद्योग आणि रोजगार प्रश्नांवरून कॉंग्रेसने राज्य सरकारवर निशाण साधला. महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्याच्या दूर्दशेस सर्वस्वी फडणवीस सरकारच जबाबदार आहे, अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ट्विटर अकाउँट वर ट्विट करत ही टीका केली आहे.

भाजप शिवसेना सरकारच्या भोंगळ कारभाराचे पितळ आर्थिक पाहणी अहवालामुळे उघडे पडले असून राज्याची विविध क्षेत्रात झालेली पिछेहाट जनतेसमोर आली आहे. अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

तसेच महाराष्ट्राची चौफेर पीछेहाट, कृषी उद्योग आणि रोजगार क्षेत्रात राज्याची पिछाडी. राज्याच्या स्थूल उत्पादनात वाढ नाही. पीक उत्पादन उणे ८ टक्के, उद्योग क्षेत्रातील वाढ घटून ६.१ टक्क्यांवर आली आहे. असा आरोप करत, फडणवीस सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे हे फलित असून महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्याच्या दूर्दशेस सर्वस्वी फडणवीस सरकारच जबाबदार आहे. असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.