विधानसभेच्या निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झालाय, शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवर टीका

टीम महाराष्ट्र देशा: पिक विम्याच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विमा कंपन्यां विरोधात आज शिवसेनेकडून मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना सत्तेत असताना देखील कंपन्यांवर दबाव टाकण्यपेक्षा रत्यावर उतरली असल्याने ठाकरेंना नेमक काय दाखवायचं आहे ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेसकडून शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करण्यात आली असून शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीत असताना शेतकऱ्याची आठवण येत नाही, मात्र विधानसभेच्या निवडणुका येताच शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर जागा येते. महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवताना यांना लाज कशी वाटत नाही? असा घणाघात कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा वाघ स्वाभिमानी नसून अतिशय लाचार आहे. अशी टीकाही करण्यात आली आहे.

मुंबईत शिवसेनेचा धडक मोर्चा

पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात झाली असून विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडक घेईल.