टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस सोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय झाला असल्याचे विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले. नवी दिल्लीत आज ( शनिवार ) कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात बैठक पार पडली.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढली. वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे अनेक उमेदवार पडले असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही पराभव वंचित आघाडीमुळेच झाला असल्याचे म्हंटले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र कॉंग्रेस यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार असल्याचा निर्णय झाला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले
इतकेच नव्हे तर कॉंग्रेस या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी ३ जुलै रोजी चर्चा करणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा करण्यात येणार वडेट्टीवार यांनी म्हंटले.