मुख्यमंत्र्यांच्या मागचं अपघातांचे शुक्लकाष्ठ सुरूच

मुख्यमंत्री सुखरुप अफवांवर विश्वास ठेवू नये - मुख्यमंत्री कार्यालय

वेबटीम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.शुक्रावारी ज्या हेलिकॉप्टर अपघातातून ते बालंबाल बचावले त्याच हेलिकॉप्टरने ते सुखरूप’वर्षा’वर पोहोचले.याआधी लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. दरम्यान मुख्यमंत्री सुखरुप असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.

नक्की काय झालं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अलिबागला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पेण येथील वडखळजवळ जेएसडब्ल्यूच्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. अलिबागमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पेणला आले. तेथून हेलिकॉप्टरने ते मुंबईला येणार होते. ते हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पुढे आले तोच अचानक हेलिकॉप्टर उड्डाण घेत असल्याचं सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं. सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकानं फडणवीस यांना लगेच बाजूला केलं. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानतेमुळं मुख्यमंत्री अपघातातून बचावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूरमधील हेलिकॉप्टर अपघात…
यापूर्वी,निलंगा येथील शिवार संवाद कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर विजेच्या ओव्हरहेड तारांना पंख्याचे पाते धडकल्याने काही सेकंदातच खाली कोसळले होते.
You might also like
Comments
Loading...