‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल

टीम महाराष्ट्र देशा :  सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.

पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २०० एसआरपीची जादा कुमक बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण प्रयन्तशील आहेत.

दरम्यान, कुर्डूवाडी शहरातील सर्व रस्ते , बायपास येथे तरुळक वाहतुक सुरु होती , रस्त्यावर चार चाकी एकही वाहन दिसत नव्हते , तालुक्याक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील एस.टी.सेवा , माढा तालुका मोटार चालक मालक संघ , यांच्यासह विविध संघटनांनी आज वाहतुक बंद करुन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. साप्ताहिक मंडई , साप्ताहीक जनावरांचा बाजारही बंद होता . यावेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र बंद : पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन