महाराष्ट्रात बिन पैशाचा तमाशा सुरू; सुनील तटकरेंचा भाजप-सेनेला टोला

पुणे: सध्या राज्यामध्ये सत्ताधारी शिवसेना- भाजप एकमेकांची उनीधुनी काढण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे एका प्रकारे राज्यात बिन पैशाचा तमाशा सुरू असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. हल्लाबोल आंदोनच्या दरम्यान पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता आज होत आहे. तत्पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे, मात्र भाजप वर्धापनदिनी आयोजित सभेतील सध्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा चुकीची असल्यास यावेळी तटकरे म्हणाले. तसेच राज्यातील शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण कोरा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...