मोदींना पर्याय महाराष्ट्र देऊ शकतो : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. ते देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी यशस्वी ठरले नाहीत. मोदींना पर्याय काय हा प्रश्‍न विचारला जातो. एका दिवसात कोणाही पर्याय उभा राहत नाही. मात्र भाजपा विरोधातील सर्वजन एकत्र येऊन महाराष्ट्र हा पर्याय देऊ शकतो, असा अंदाज माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला .नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. ते देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी यशस्वी ठरले नाहीत .मागील चार वर्षांमध्ये देशातली परिस्थिती पाहिली तर एका वेगळ्याच स्थितीतून देश जातो आहे. राज्या-राज्यांमध्ये, माणसांमध्ये, समाजांमध्ये एकवाक्यता कशी राहिल याची काळजी केंद्र सरकारने घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही, समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे. मोदींना पर्याय काय हा प्रश्न विचारला जातो. एका दिवसात कोणाही पर्याय उभा राहत नाही. मात्र भाजपा विरोधातील सर्वजन एकत्र येऊन महाराष्ट्र हा पर्याय देऊ शकतो,