मुंबई : Maharashtra Cabinet Expansion राज्यात भाजपच्या पाठींब्याने शिंदे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. भाजप आणि शिंदे यांच्यात विभाग आणि मंत्रिपदांच्या वाटणीबाबत सहमती झाल्याचे चित्र राज्यात आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, शिंदे गटात खुद्द शिंदेंसह 40 नेत्यांचा समावेश असून, त्यापैकी 16 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, तर सरकारमधील 27 मंत्री भाजपचे असतील. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, युतीमध्ये एक तृतीयांश आमदार असलेल्या शिंदे गटाला 30 टक्क्यांहून अधिक मंत्रीपदे मिळवण्यात यश आल्याची चर्चा आहे. भाजप गृह, अर्थ, महसूल, सहकार आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार आहे. यावरून शिवसेनेचे शिंदे सरकार चालवणार असले तरी भाजपचीच सत्ता राहणार हे सिद्ध होते. दुसरीकडे, शिंदे गटाला नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कृषी आणि ग्रामविकास विभाग मिळू शकतात.
महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच समावेश आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. सर्व मंत्रीपदे एकाच वेळी भरली जाणार नाहीत, काही मंत्रीपदे तूर्तास रिक्त ठेवण्यात येतील, असे भाजप नेत्याने सांगितले.
तसेच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शिंदे गटातील नेत्यांमध्ये मंत्रिपदावरून असंतोष चव्हाट्यावर येऊ शकतो. प्रत्येकाला कॅबिनेट मंत्री व्हायचे आहे. ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू हे कृषीमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत. अशा स्थितीत शिंदे गटात जोरदार खडाजंगी होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Viral video | पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
- Petrol Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
- Eknath Shinde : “१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत”, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”; राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<