मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाविकास आघाडीच्या आमदारांच्या विरोधाचा जोरदार सामना करावा लागला. राज्यपाल कोश्यारी सभागृहाला संबोधित करत असताना सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांना आपले भाषण अर्धवट सोडावे लागले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी शब्दात उल्लेख करत. गुरु समर्थ रामदास स्वामी नसते तर आज छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?, असे वक्तव्य केले होते.
यामुळे त्यांना आज सत्ताधारी आमदारांचा सामना करावा लागला. सभागृहाबाहेरही आमदारांचा निषेध सुरूच होता. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ चक्क ‘शिर्षासन’ केले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांवर तिखट शब्दात टीका केली. या आधी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यभरात निदर्शनांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दरम्यान विरोधकांनी देखील इडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नासाठी असलेले अधिवेशन आज राजकारण्यांच्या गदारोळात संपले.
महत्वाच्या बातम्या:
-
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मोठं ट्विट
-
‘छत्रपतींच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य होणं आवश्यक, अन्यथा…’; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
-
केळी उत्पादक होणार आता मालामाल; शेतकरी मित्रांनो हा दुहेरी फायदा वापरून पहाच..
-
कोठडीत वाढ केल्याप्रकरणी नवाब मलिकांचे वकील म्हणाले, ‘…ईडीला गृहपाठाची गरज’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<